म्हसावद l प्रतिनिधी
आदिवासी विकास विभाग अंतर्गत तळोदा प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धाचे शासकीय माध्यमिक आश्रम शाळा शिर्वे येथे करण्यात आले.
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा अमोनी येथील विद्यार्थ्यांनी या सांघिक खेळ या स्पर्धेत यश संपादन केले आहे.झालेल्या स्पर्धेत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेमध्ये शासकीय माध्यमिक आश्रम शाळा अमोनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांघिक खेळामध्ये आपला समावेश नोंदवला.
विभागीय स्तरीय निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे 17 वर्ष वयोगटातील मुलांचा खो-खो संघ विजयी, 14 वर्ष वयोगटातील मुलांचा हँडबॉल संघ विजयी ,17 वर्ष वयोगटातील मुलांचा हँडबॉल संघ उपविजेता, 17 वर्ष वयोगटातील मुलींचा हँडबॉल संघ उपविजेता, 14 वर्ष वयोगटातील मुलांचा खो-खो संघ उपविजेता 14 वर्ष वयोगटातील मुलींचा हँडबॉल संघ उपविजेता अशाप्रकारे सांघिक खेळ प्रकारात एकूण 21 मुले खेळाडू आणि मुली खेळाडू यांची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.सर्व यशस्वी खेळाडूचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.
या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक पी.यु तपासे, क्रीडा प्रशिक्षक डेव्हिड वसावे,क्रीडा मार्गदर्शक हेमराज राजपूत संघ व्यवस्थापक अनिल वसावे, रतनसिंग पावरा यांचे मार्गदर्शन लाभले होते.








