नंदुरबार l प्रतिनिधी
कॉलेजने दिलेली शिकवण, केलेले संस्कार, जगाला निधड्या छातीने सामोरे जाण्यासाठी रुजविलेली सकारात्मक इच्छा शक्ती ही शिदोरी घेवुन आतापर्यंत यशस्वीरित्या केलेल्या वाटचालीबद्दल गुरुजनांप्रती तसेच कॉलेजबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोबत शिकणाऱ्या तत्कालीन सवंगड्यासोबतचे मैत्रिचे धागे अधिक घट्ट करण्यासाठी तब्बल ५१ वर्षानंतर येथील आर्टस, कॉमर्स व सायन्स कॉलेज (जीटीपी नंदुरबार) १९७१ मधील प्रथम वर्ष (पी.डी.) सायन्सचे विद्यार्थी व्हॉटसअपच्या माध्यमातुन एकत्र आले.
स्नेह सम्मेलनात बहुतांश विद्यार्थी त्यांच्या पत्नीसह सहभागी झाले. विशेष म्हणजे ५१ वर्षांपूर्वी विज्ञान महाविद्यालयात शिक्षण देणारे गुरुजन सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित होते. माजी प्राचार्य बी. एस. पाटील, डी.एस.पाटील, जी.डी. पाटील, बेंद्रे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गुरुजनांचा शाल, श्रीफळ, बुके देवून सत्कार करण्यात आला.
५१ वर्षानंतर सर्वांनी आपल्या आयुष्याच्या जडण-घडणचा परिचय मित्रांना सांगितला व जुन्या आठवणींना उजाळा दिला. बरेच विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर्स, शिक्षक, काही उद्योजक, काही बँकेत अधिकारी होते. स्नेह संम्मेलन पी. जी. ॲन्ड सन्स हॉटेल रिसॉर्ट नंदुरबार येथे पार पडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आशा शहा यांनी केले.
कार्यक्रमात माजी विद्यार्थी धुळ्याचे प्रसिद्ध डॉ. दिलीप पाटील, डॉ. युवराज पवार, डॉ. नंदकिशोर भावसार, प्रा. राजेंद्र वाणी, आत्माराम माळी, मा.मुख्याध्यापक श्रावण मराठे, उद्योजक राजन राजवाणी, इंजिनिअर ज्ञानेश्वर तांबोळी, प्रा. जिभाऊ काळे, वामन अहिरे, उद्योजक मदन शिंपी, प्रकाश पाटील, प्रा. पितांबर पाटील, उद्योजक पियुष शहा, दिलीप पुराणिक, हिरामण साळुंखे, ॲड. के. एच. वळवी, निला गोसलिया, आशा शहा असे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी मनोरंजनाचे कार्यक्रम गाणी म्हटली. सर्वांनी एकमेकांचे आभार मानले.पुढच्यावर्षी सन २०२३ मध्ये सर्वांनी सपत्निक एकत्र गेट टू गेदर बाहेरगांवी करावयाचे ठरविले. कार्यक्रमासाठी राजेंद्र वाणी, श्रावण मराठे, आत्माराम माळी, ज्ञानेश्वर तांबोळी, राजन राजवाणी यांनी विशेष परिश्रम घेतले.
यांनी लावली बाहेरगावाहुन हजेरी
पुण्याहुन प्रा.पितांबर बी.पाटील, मुंबईहुन निला गोसलिया, आशा शहा, ठाण्याहुन उद्योजक पियुष शहा, प्रकाश पाटील, अहमदाबादहून दिलीप पुराणिक, सुरतहून निवृत्त आयुक्त अकबर कादरी, रविंद्र नगोरिया, धुळ्याहुन डॉ. दिलीप पाटील, प्रा.जिभाऊ काळे, नाशिकहून डॉ.युवराज पवार, शहाद्याहुन डॉ.नंदकिशोर भावसार, वामन अहिरे, साक्रीहुन सुभाष बोरसे, हिंमतराव साळुंके उपस्थित होते.








