Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

छात्रालयात विद्यार्थ्याचा मृत्यू, मोलगी येथे २४ नोव्हेंबरपासून बेमुदत रास्तारोको

team by team
November 20, 2022
in राजकीय
0
इलेक्ट्रीक मोटर चोरणारा सराईत टोळी जेरबंद, ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

नंदूरबार | प्रतिनिधी

 

छडवेल कोर्डे ता.साक्री येथील छात्रालयातील विद्यार्थी साहिल दिलीप पाडवी याच्या मृत्यूची सीबीआयद्वारे चौकशी करण्यात येवून संबंधित संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापकांची नार्कोटेस्ट करण्यात यावी या मागणीसाठी दि.२४ नोव्हेंबरपासून सातपुडा बचाओ आंदोलन , भिल सोशल वेल्फेअर असोसिएशन , महाराष्ट्र ट्रायबल आघाडी नंदुरबार जिल्हा , नर्मदा प्रदेश विकास मोर्चा तर्फे मोलगी येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

याबाबत सातपुडा बचाओ आंदोलनातर्फे मोलगी येथील पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छडवेल ता.साक्री येथील छात्रालयातील विद्यार्थी मयत साहिल दिलीप पाडवी (वय १५) रा. अटीबारीपाडा साकलीउमर ता.अक्कलकुवा याचा मृत्यू झाला.

 

त्याच्यावर दि.१८ नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याठिकाणी मयत विद्यार्थ्याचे वडील दिलीप पोना पाडवी यांनी त्याच्या मृत्यूबाबत गंभीर परिस्थिती निदर्शनास आणून दिली. मयत विद्यार्थ्याला जबर मारहाण करण्यात आली असून गळफास दाखवण्याचा आरोपींनी प्रयत्न केला आहे.

 

मृतदेह जमिनीवर टेकलेल्या अवस्थेत होता. गळफास घेतलेल्या रुम नंबर ९ मधील व इतर विद्यार्थ्यांना पालकांनी भेटण्याचा प्रयत्न केला असतांना विद्यार्थ्यांना भेटू दिले गेले नाही. याबाबत आरोपींची सीबीआयद्वारे चौकशी करुन कारवाई करावी व सदर प्रकरणाची राज्य सरकारने जलद चौकशी करून आरोपीची नार्कोटेेस्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

मयताच्या पालकांच्या व परिसरातील आदिवासी जननतेच्या मागणीप्रमाणे चौकशी व कार्यवाहीसाठी सातपुडा बचाओ आंदोलन भिल सोशल वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र ट्रायबल आघाडी नंदुरबार जिल्हा व नर्मदा प्रदेश विकास मोर्चाच्या वतीने मोलगी ता.अक्कलकुवा येथे दि.२४ नोव्हेंबरपासून बेमुदत रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा डॉ.सतिष कागल्या पाडवी यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होवु शकत नाही :भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Next Post
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होवु शकत नाही :भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होवु शकत नाही :भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add