नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात महिला बचत गटांना सक्षमीकरण करण्यासाठी होणाऱ्या गैरवसुलीला आढावा घालावा. या मागणीसाठी भील प्रदेश ब्रिगेड मार्फत निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हात महिला बचत गटाना महिला सक्षमीकरन करण्यासाठी शासन व बँका विविध योजना राबवतात , फायनान्स कंपन्या आदिवासी महिला बचत गटांना कर्ज फेड केले तरीही नविन हप्ता वसुली करत आहेत , महिला बचत गटांना धमकी देतात व अपमानित करत आहेत. तरी नंदुरबार जिल्हात फायनान्स लि . कंपन्याना नंदुरबार जिल्हातून तडीपार करण्यात याव्यात व कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात बेरोजगारी मुळे महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली खाजगी मायक्रो फायनान्स कंपनी भारत फायनान्स कंपनी . नम्रता फायनान्स कंपनी यांच्या सारख्या अनेक अशा कंपन्या नंदुरबार जिल्हात गुंड प्रवृत्तीच्या पुनर्प्राप्ती एजेंट ( वसूली धारक ) बेकायदेशीररित्या आदिवासी व दलित महिलांना पुरुषांना आपला बळाचा वापर करून कर्जधारकांच्या घरात घुसून कुटुंबातील सदस्यांना तसेच कर्जधारकाला शिवीगाळ करून दहशत निर्माण करतात.
कर्ज वसूलीखाली महिलांना अश्लील भाषेत व आदिवासी दलित समाजाला जाती वाचक शिवीगाळ करून धमकी देतात म्हणून या फायनान्स कंपन्यांना नंदुरबार जिल्ह्यातून तडीपार करण्यात येऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भिल प्रदेश बिग्रेड तर्फे देण्यात आला आहे .सदर मागणीचे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले .यावेळी भिल प्रदेश ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित तडवी ,महाराष्ट्र प्रभारी कांतीलाल , जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाडवी, बंटी नेतलेकर तसेच महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.








