तळोदा l प्रतिनिधी
प्रभागात नावीन्य व प्रभागातील लोकांशी भावनिक नाते जोपसण्यात अग्रेसर राहणारे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका सौ.अनिता संदीप परदेशीं यांच्या कडून 14 नोव्हेंबर बालदिना निमित्त माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग दादा पाडवी यांच्या अध्यक्षते खाली प्रभागातील 476 लहान मुलांना व मुलींना प्रत्येकी हातातील लहान घड्याळ,बिस्कीट पुडा तसेंच सन्मानपत्र देऊन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात जेष्ठ नेते केसरसिंग क्षत्रिय,तालुका अध्यक्ष पुंडलिक राजपूत,शहर अध्यक्ष योगेश मराठे,युवा नेते संदीप परदेशीं,सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण मगरे सर,उपाध्यक्ष गणेश पाडवी,नदीम बागवान,अल्संख्यांक तालुका अध्यक्ष आरीफ शेख,सचिव याकूब , उपाध्यक्ष आदिल शेख,सरचिटणीस महेंद्र पोटे,संघटक राहुल पाडवी,मार्गदर्शक संजय राणे, पूनम मराठे,मोनाली पाडवी,निकिता राणे,गायत्री क्षत्रिय,युवक उपाध्यक्ष आदित्य रामराज्ये,योगेश क्षत्रिय,विकास क्षत्रिय, इमरान सिकलीकर,आरीफ शेख,असिफ बाबा,प्रकाश पाडवी,बंटी माळी उपस्थित होते.









