शहादा l
जननायक क्रांतीसुर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतिनिमित्त भारतीय जनता पक्ष आदिवासी मोर्चाचे वतीने प्रतिमापूजन कार्यक्रम शहादा येथील आमदार कार्यालयात संपन्न झाला.
जनजातीय गौरव दिनाचे औचित्य साधून धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतिनिमित्त अभिवादन व प्रतिमापूजन कार्यक्रम भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या सूचनेनुसार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थित आमदार कार्यालय शहादा येथे पार पडला.
या अभिवादन व प्रतिमापुजन कर्यक्रमास आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे ,आरपीआय जिल्हाध्यक्ष अरविंद कुंवर ,शहादा भाजप शहराध्यक्ष विनोद जैन,भाजप तालुकाअध्यक्ष डॉ.किशोर पाटील ,भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष दिनेश खंडेलवाल,प्रा.नेत्रदीपक कुंवर ,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सचिन देवरे,हेमराज पवार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.









