नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील दुधाळे येथील पिडीत अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवुन पळवुन नेवुन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा प्रमुख व सत्र न्यायालय , नंदुरबार यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी ( १५ वर्ष) ही तिच्या आईवडील व दोघे भावंडांसह दुधाळे ता.जि.नंदुरबार येथे राहणारी आहे.दुधाळे गावातीलच राहणारा धिरज पाशा पवार यास पिडीत ही ३ वर्षापासुन ओळखत होती . आरोपी धिरज हा विवाहीत असुन त्याला ३ मुले देखील आहेत . धिरज पाश्या पवार याचे पिडीत मुलीचे घरी नेहमीच येणे – जाणे होते . त्यामुळे त्याची व अल्पवयीन मुलीची ओळख निर्माण झाल्याने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते . धिरज पवार याने पिडीत अल्पवयीन मुलीस तिचे अज्ञानाचा फायदा लग्नाचे आमिष दाखवून पिडीत मुलीचा आरोपी धिरज पवार यांच्यावर विश्वास बसल्याने याचा फायदा घेत त्याने तिच्यावर ३ ते ४ वेळेस अत्याचार केला होता . आरोपी धिरज पवार हा नाशिक येथे मजुरी कामानिमित्त निघुन गेला होता . त्यानंतर तेथुन तो अल्पवयीन पिडीत मुलीसोबत मोबाईलव्दारे संपर्कात राहुन त्याने तिला मोटारसायकलने दुधाळे येथुन नाशिक येथे पळवुन नेले होते . नंतर नाशिक येथे तिला एका खोलीत ठेवत तिचे अज्ञानाचा फायदा घेत व लग्नाचे खोटे आमिष दाखवून वेळोवेळी तिचेवर अत्याचार केला होता . पिडीत मुलीचे आईवडीलांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी आरोपी धिरज पाश्या पवार व पिडीत मुलीस नंदुरबार येथे आणले होते . लग्नाचे आमिष दाखवुन व पिडीत मुलीचा अज्ञानाचा फायदा घेत तिचेवर अत्याचार केला म्हणुन पिडीतेच्या फिर्यादीवरुन धिरज पाशा पवार रा.दुधाळे ता.जि.नंदुरबार यांच्या विरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादवि क . ३६३,३६६ , ३७६ ( ३ ) , पोक्सो- ४ व ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर . एस . तिवारी , नंदुरबार यांच्या न्यायालयात होवुन आरोपी धिरज पाश्या पवार विरुध्द गुन्हा शाबीत झाल्याने त्यास दोषी ठरवत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा तसेच रुपये ५ हजार दंड व दंड न भरल्यास १ वर्ष कारावास अशी शिक्षा सुनावली आहे . सदर खटल्यातील फिर्यादी अल्पवयीन पिडीतेची साक्ष महत्त्वाची ठरली . वरील गुन्हयाचा सखोल व जलद तपास करुन आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपन्न पोसई कमलाकर चौधरी यांनी सादर केले होते . सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे अति . सरकारी वकील ॲड . व्ही.सी.चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले आहेत व पैरवी अधिकारी म्हणुन पोना.नितीन साबळे व पोना गिरीष पाटील यांनी कामकाज पाहीले आहे . तपास अधिकारी पोसई कमलाकर चौधरी व अति . सरकारी वकील ॲड. व्ही.सी.चव्हाण यांचे पोलीस अधीक्षक महेंद्र पेंडीत व अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी अभिनंदन केले आहे .