नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे खुनाची धमकी देणारे व्हॉटसअप स्टेटस ठेवण दोघांना चांगलेच महागात पडले असून शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश चौधरी आणि चेतन चौधरी अशी संशयीत आरोपीतांची नावे असुन, दि.३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या मोबाईल वरील व्हॉटसअप स्टेटसला ‘ ले बेटा फिर आनी आता डायरेक्ट ३०२’ असा मजकुर अपलोड करुन कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या प्रकार झाला आहे. यामुळे समाजातील शांतता भंग होत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनात आल्याने पोलीस नाईक नरेद्र देवराज यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिनेश चौधरी व चेतन चौधरी यांच्या विरुद्ध भादवि कलम 504.३४ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 112,११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक श्रीकांत माळी करत आहे.