नंदुरबार l प्रतिनिधी

येथील जिल्हा क्रीडा संकुलात ३३ व्या नाशिक परिक्षेत्रीय तायक्वांदो पोलीस क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. यावेळी १६ पोलीस स्पर्धकांची निवड करण्यात आली. हा संघ राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. सदर स्पर्धा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर पोलीस क्रीडा प्रमुख म्हणून योगेश सोनवणे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत नंदुरबार, धुळे, जळगांव, अहमदनगर, नाशिक (ग्रामीण), नाशिक शहर असे एकुण ६ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत पुरुष गटात ५४ किलो वजन गटात योगेश महादू भिल (जलगांव, प्रथम), ५८ किलो वजन गटात संदीप विठ्ठल पाटील (जळगांव, प्रथम), सचिन सुभाष गवळी (जळगांव, द्वितीय), ६३ किलो वजन गटात देविदास वासुदेव चिमणकर (जळगांव, प्रथम), प्रणय सुरेश पवार (जळगांव, द्वितीय), ६८ किलो वजन गटात विक्रम विजय पाटील (जळगांव, प्रथम),
भुषण सुशिल जळगांव (जळगांव, द्वितीय), ७४ किलो वजन गटात जयेश यशवंत रावमोरे (प्रथम), सुनिल बाबुराव मोरे (द्वितीय), ८० किलो वजन गटात पंकज रामचंद्र शिंदे (प्रथम), अभिजीत तानाजी पोटींदे (नाशिक ग्रामीण, द्वितीय), ८७ किलो वजन गटात तुषार विश्वास पाटील (प्रथम), कमलेश भगवान पाटील (तृतीय), ८७ किलो वरील गटात जितेंद्र संतोष सोनवणे (प्रथम), सागर सोनवणे (द्वितीय) तसेच महिला गटात ४६ किलो वजन गटात प्रियंका निजवे (अहमदनगर, प्रथम), शितल लोखंडे (नाशिक, द्वितीय), ४९ किलो वजन गटात निंबा रामा वाघमोडे (नंदुरबार, प्रथम), ५३ किलो वजन गटात अंकीता पोटोळे (अहमदनगर, प्रथम), ५७ किलो वजन गटात कोमल बापू पवार (नंदुरबार, प्रथम), ६२ िकलो वजन गटात सोनिया राजेंद्र चौधरी (प्रथम), ६७ किलो वजन गटात शामल जोशी (नाशिक शहर, प्रथम), ७३ किलो वजन गटात मयुरी गांगुर्डे (नाशिक शहर, प्रथम), ७३ किलो वरील वजन गटात कोमल सुरेश शिंदे (अहमदनगर, प्रथम) या खेळाडूंनी यश मिळविले. पंच म्हणून नंदुरबार जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव जावेद बागवान, सैय्यद शाहीद, सुफीयान काझी, सैय्यद यामीन, साहील शेख यांनी काम पाहिले.









