नंदुरबार l प्रतिनिधी

येथे जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजन समितीतर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्त माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते रंगमंच व नटराज पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष रवींद्र पवार, नगरसेवक जगन माळी, अतुल पाटील सर, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर भावसार, अनिल पाटील, जिभाऊ करंडक आयोजन समितीचे नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नाट्यकर्मींना शुभेच्छा दिल्यात. यावेळी प्रथमच नाट्य क्षेत्रातील कलावंतांसोबतच गायन, संगीत व इतर सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंत देखील उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर भावसार व नाट्यकर्मी रवींद्र जोशी यांनी जुन्या व नव्या पिढीतील नाट्य चळवळी बाबत भाष्य केले. सर्व क्षेत्रातील कलावंत एकत्र आल्यास नाट्य चळवळीस नवे स्वरूप प्राप्त होईल असे मत प्रभाकर भावसार यांनी मांडले.
कार्यक्रम दरम्यान राम दाऊतखाने, चंद्रशेखर चव्हाण, रणजीत राजपूत यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नाट्य चळवळीवर प्रकाशझोत टाकला. यावेळी नाट्यकर्मी मनोज सोनार, राजेश जाधव, आशिष खैरनार, सुरसिंगार संगीत विद्यालयाचे सारंग रोकडे, सिने दिग्दर्शक डॉ. सुजित पाटील, अरुण सोनार, विनोद ब्राह्मणे, जितेंद्र खवळे, तुषार सांगोरे, रोटरी क्लब ऑफ नंदनगरी चे सचिव किरण दाभाडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष सतीश चौधरी, तांबोळी सर, एन.टी.पाटील सर, तुषार सोनवणे, राकेश कलाल, महादू हिरणवाळे, चंद्रमणी बर्डे, निंबा पाकळे , सुनील कुलकर्णी, नारायण अहिरे, आशिष कापडणीस बालकलावंत राजश्री अहिरे, पार्थ जाधव, नैतिक अहिरे, शशांक जाधव यांच्यासह लायन्स क्लब व रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सदस्य देखील उपस्थित होते.









