नंदुरबार l

अक्कलकुवा येथील बीएसएनएल ऑफिसजवळ भांडणाची कुरापत काढून चौघांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा येथील मोईनखान सईदखान कुरेशी हे त्यांचे मित्र मुख्तार यांच्या घरासमोर मोबाईल पाहत बसलेले होते. यावेळी सलिमखान दाऊदखान कुरेशी व त्याचा भाऊ गफ्फारखान दाऊदभाऊ कुरेशी यांनी भांडणाची कुरापत काढून मोईनखान कुरेशी व त्यांची आई सईदाबाई व वडील सईखान आणि भाऊ जुबेर यांना हाताबुक्यांनी, काठी व बॅटने मारहाण करुन दुखापत केली.
याबाबत मोईनखान कुरेशी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३२४, २३४, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









