नंदूरबार l प्रतिनिधी
ऑनलाइन किंवा फ्रॉड कॉलने आपली रक्कम बँकेतून उडवली असेल तर स्वस्त न बसता तात्काळ सायबर क्राईमशी संपर्क करून आपले पैसे मिळू शकतात याचे ज्वलंत उदाहरण नवापूर शहरातील विकास शहा यांचे आहे. विज बिल भरण्याचा नावाने तीन लाख रूपये ऑनलाईन पध्दतीने मोबाईल हॅक करून बँक खात्यातून लंपास करण्यात आले होते.त्यानंतर त्यांनी बॅंक अधिकारी व पोलिसात तक्रार केल्याने त्यांना संपूर्ण रक्कम नंदुरबार पोलिसांनी मिळवून दिली.

नवापूर शहरातील स्टॅम्प वेंडर तथा एलआयसी एजंट विकास शहा यांचे इलेक्ट्रिक सिटी नाव असलेल्या नंबर वरून त्यांना फोन आला आणि तुमचे लाईट बिलाचे अकरा रुपये बाकी आहे ते त्वरित भरा असे सांगून त्यांच्या अकाउंट मधून दोन लाख 98 हजार रुपये मोबाईल हॅक करून बँकेच्या खात्यामधून पैसे काढून घेतले होते. सदर प्रकार 18 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडला होता तक्रारदार विकास शाह यांनी तात्काळ बँक व पोलिसांना संपर्क केल्याने त्यांचे पैसे काही दिवसातच नंदुरबार सायबर क्राईमने मिळवून दिले. 2 लाख 98 हजार रुपये वॉलेट आणि संबंधित बँक नोडल ऑफिसर यांच्या मदतीने परत मिळवण्यात सायबर सेल,नंदुरबार येथील पथकाला यश आले आहे.
अलीकडे आर्थिक फसवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या फसवणुकीला अनेक जण बळी पडले आहेत. मात्र एकदा फसवणूक झाल्यानंतर किंवा आपल्या बॅंक खात्यातून पैसे गेल्यानंतर नेमके काय करायचे? आपली रक्कम परत कशी मिळवायची ? याबद्दल बहुसंख्य लोकांना अद्यापही पुरेशी कल्पना नाही.
ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकता –
1. तुमचा नेट बँकिंग पासवर्ड, ओटीपी, एटीएम पिन, फोन बँकिंग पिन, कार्ड सीव्हीव्ही नंबर किंवा एक्सपायरी डेट यासारखी कोणतीही गोपनीय माहिती कधीही कोणाशीही शेअर करू नका.
2. सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क किंवा सार्वजनिक संगणक वापरताना पूर्णपणे आर्थिक व्यवहार करू नका.
3. तुमच्या ऑनलाइन बँकिंग खात्यांसाठी कठीण पासवर्ड वापरा आणि तो वेळोवेळी बदला.
4. ऑनलाइन बँकिंग सेवांमध्ये लॉग इन करताना नेहमी व्हर्च्युअल की-बोर्ड वापरा.
5. ऑनलाइन बँकिंग काम पूर्ण केल्यानंतर तुमच्या वेब ब्राउझरमधून नेहमी ब्राउझिंग डेटा हटवा.
6. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर येणाऱ्या व्यवहाराच्या सूचनांकडे नेहमी लक्ष द्या
7. ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला बळी पडल्यास,155260 वर कॉल करा आणि तत्काळ तक्रार नोंदवा.
8. तुम्हाला 10 दिवसांच्या आत तुमचे पैसे परत मिळू शकतील.
ऑनलाइन फ्रॉड होतास घाबरून न जाता तात्काळ बँक अधिकारी व सायबर सेल विभागाला संपर्क करून आपले पैसे मिळू शकतात.