Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते कार्डियाक ॲम्बुलन्सचे लोकार्पण, संभाव्य तिसऱ्या लाटेची दक्षता; रुग्णांना मिळतील तात्काळ उपचार

Mahesh Patil by Mahesh Patil
September 1, 2021
in राजकीय
0
माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते कार्डियाक ॲम्बुलन्सचे लोकार्पण,  संभाव्य तिसऱ्या लाटेची दक्षता; रुग्णांना मिळतील तात्काळ उपचार
नंदुरबार l प्रतिनिधी
माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून धडगाव नगरपंचायत व नंदुरबार नगरपालिकेला प्रत्येकी १ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्‍यता आरोग्य विभागाने वर्तविली असून, रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळावे यासाठी रुग्णवाहिकेचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शिवसेनेचे नेते,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते आज मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील वाड्या पाड्यांवर राहणाऱ्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी धडगाव नगरपंचायतीला १ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे नंदुरबार पालिकेला देखील दोन रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे,पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,नगरसेवक कुणाल वसावे,सुनील सोनार, अभियंता विशाल कांबळे, गजेंद्र शिंपी,प्रविण गुरव,प्रीतम धंढोरे,प्रेम सोनार, चेतन वळवी,फारूक मेमन,फरीद मिस्तरी,मोहित राजपूत आदी उपस्थित होते.
अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज
कोरोनाच्या महामारीत रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे रुग्णवाहिकेची मोठ्या प्रमाणावर गरज भासत होती. अशावेळी खाजगी रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक होत होती. रुग्णवाहिका भेटलीच तर त्यात अत्यावश्यक सोयीसुविधा नव्हत्या. अशावेळी रस्त्यातच रुग्णांच्या मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून देण्यात आलेल्या रुग्णवाहिका अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची सोय करण्यात आली आहे.
डॉक्टरांची नेमणूक करणार
रुग्णवाहिकेतील रुग्णास पुढील उपचारासाठी बाहेर गावी हलविण्याच्या वेळेस रुग्णवाहिकेसोबत एका डॉक्टरास रुग्णालयापर्यंत पाठवण्यात येईल. मानधन तत्वावर डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार असून, सध्या प्रक्रिया सुरू असल्याचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले
बातमी शेअर करा
Previous Post

प्रा.ॲड.मोनिका मीना यांना आंतरराष्ट्रीय ग्लोरी अवॉर्ड

Next Post

पोलीस ठाण्याच्या ५०० मिटरवर झाल्या दोन घरफोड्या, सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास

Next Post

पोलीस ठाण्याच्या ५०० मिटरवर झाल्या दोन घरफोड्या, सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025
शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

June 30, 2025
तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

June 28, 2025
खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

June 28, 2025
के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group