नंदुरबार l
अक्कलकुवा तालुक्यातील छोटी राजमोही येथील शेतातून चोरट्याने ८ हजार रुपये किंमतीचा मका चोरुन नेल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा येथील देविदास शंकर चौधरी यांचे मालकीचे छोटी राजमोही शिवारात गट क्र.३९ येथे शेत आहे. सदर शेतात नदीम मोहम्मद कलिम बलोच याने १० ते १५ मजूरांसह प्रवेश करुन कापणीसाठी असलेला ८ हजार रुपये किंमतीचा मका चोरुन नेला.
याबाबत देविदास चौधरी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात संशयित नदीम मोहम्मद कलिम बलोच याच्याविरोधात भादंवि कलम ३७९, ४४७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रितेश राऊत करीत आहेत.








