नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार 29 ऑक्टोंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार 29 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.40 वाजता पोलीस कवायत मैदान, नंदुरबार हॅलीपॅड येथे आगमन.सकाळी 10.45 वाजता नंदुरबार पोलीस कवायत मैदान येथे आगमन. मानवंदना व स्वागत. 11-00 वाजता नंदुरबार नगर परिषद नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन (स्थळ- नूतन प्रशासकीय इमारत, स्टेशन रोड, नंदुरबार ) सकाळी 11-20 मोटारीने श्री.छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराकडे प्रयाण. 11.-30 वाजता सत्कार, मानपत्र व मान्यवरांचे मनोगत समारंभ कार्यक्रमास उपस्थिती.
( स्थळ- श्री.छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिर, नंदुरबार ). दुपारी 12.15 वाजता फार्म हाऊसकडे प्रयाण व राखीव. दुपारी 1.15 वाजता गजमल तुळशिराम पाटील मैदानाकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 1.30 वाजता जाहीर सभेस उपस्थिती. (स्थळ – गजमल तुळशिराम पाटील महाविद्यालय मैदान,नंदुरबार ). दुपारी 3-00 वाजता महाविद्यालय मैदान येथूनल मोटारीने पोलीस कवायत मैदानाकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता पोलीस कवायत मैदान येथे आगमन व तेथून हेलिकॉप्टरने धुळेकडे प्रयाण.








