नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील मोरवड येथे आरती पूजन मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, खा. डॉ. हिना गावित, आमदार आमश्या पाडवी, जितेंद्र पाडवी, नारायण ठाकरे यांनी या समाधीचे चे प्रमुख चंद्रसेन बाबा यांची भेट घेऊन सर्व या परिसरातील माहिती जाणून घेतली.
व्यसनमुक्तीच्या तसेच आपल्या शासनाकडून मिळालेल्या पंतप्रधान आवास योजना शबरी योजना अशा विविध योजनेतून जे घरकुल मिळाली त्याच्यासमोर प्रत्येकाने दहा ते अकरा झाडे लावावी असे आवाहन केले व पर्यावरण रक्षण करण्याच्या संकल्प करण्याचे सांगितले तसेच आजच्या तरुण दारू गुटखा अशा ज्या काही वस्तू सेवन करतो त्याने तो आजच्या दिवसापासून संकल्प करून बंद करावा असेही त्यांनी सांगितले तसेच निरोगी शरीर हे खरोखरीच चांगले असते याकरिता हा संदेश मी तुम्हाला देतो आहे संत गुलाम महाराज तसेच संत रामदास महाराज दगोबा माता यांनी त्यावेळेस हा संदेश दिला होता त्याचे पालन करा असे आवाहन त्यांनी केले.
![](https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2022/10/1666578809866-300x225.jpg)
यानंतर आरती पूजनाचा कार्यक्रमानंतर सर्व पन्नास ते साठ हजार भाविकांना तीर्थप्रसाद देण्यात आला या रंजनपुर गावी दिपवाळी महाशिवरात्री आषाढी एकादशी आषाढी वाद्य सप्तमी असे वर्षातून चार वेळा संत गुलाम महाराज संत रामदास महाराज मा दगोबा माता यांच्या समाधीस्थळी हा धार्मिक कार्यक्रम वर्षातून चार वेळा होतो परंतु गेल्या दोन वर्षापासून करोना महामारीच्या आजार असल्याने दोन वर्ष हा कार्यक्रम होऊ शकला नाही तरी आज दिपवाली उत्सव निमित्त मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती.
याप्रसंगी पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनीही या थोर संत गुलाम महाराज संत रामदास महाराज तसेच दगोबा मा यांनी केलेल्या देशाकरता केलेली क्रांती आदिवासी जनतेला तसेच सर्व भाविकांना प्रोत्साहन देणारी आहे असे सांगितले व व्यसनमुक्तीच्या तसेच शासनाने दिलेल्या विविध योजनांमधून घरकुल योजना या योजनेत प्रत्येकाने आपल्या घराजवळ शौचालय बांधावा व त्याचा वापर करावा असे आवाहन भाविकांना केले.
याप्रसंगी नारायण ठाकरे, हिरामण पाडवी, किसन महाराज, अशोक पाडवी, संजय पाडवी, प्रेमराज पाडवी, परेश पाडवी यांनी विशेष परिश्रम घेऊन हा दिवाळीचा उत्सव यशस्वी केला. याप्रसंगी तळोदा तालुक्याचे माजी सभापती जितेंद्र पाडवी यांनीही सर्व भाविकांना उपदेश केला आणि त्याप्रमाणे आजचा तरुणांनी व्यसनापासून लांब राहावे असे आवाहन करून जितेंद्र पाडवी यांनी
सर्वांचे आभार मानले.