Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खासदारांनी योजनेचे श्रेय घ्यावे पण, यापूर्वीच १०५ घरकुलांचे प्रस्ताव मंजूर, नंदुरबारातच कमी घरकुले कसे; माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांचा सवाल

team by team
August 30, 2021
in राजकीय
0
नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहिर करण्यासाठी नियोजन समितीत ठराव करावा, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी
नंदुरबार ! प्रतिनिधी
खासदारांनी पंतप्रधान आवास योजनेचे जरुर श्रेय घ्यावे.पण, मागील वर्षीच नंदुरबार नगरपालिकेच्या १०५ घरकुलांचे प्रस्ताव शासनाने मंजूर केले आहेत. शहादा,तळोदा पेक्षा नंदुरबारात कमी घरकुले मंजूर का झाली असा सवाल शिवसेनेचे नेते, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील पालिका क्षेत्रामध्ये २ हजार ९१ घरकुलांना केंद्र शासनाने मंजुरी दिली. बेघरांसाठी घरकुले आपल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याच्या दावा खा.डॉ हिना गावित यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला होता. त्यावर आज सोमवारी माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात नंदुरबार नगरपालिकेने सर्व्हे करून पात्र १०५ लाभार्थ्यांची यादी शासनाकडे पाठवली होती.त्यास मंजुरीही  मिळाली होती.
काँग्रेस सरकारच्या काळात इंदिरा गांधींच्या नावाने ‘इंदिरा गांधी आवास योजना’ राबविण्यात आली होती. याचा अर्थ असा होत नाही की, काँग्रेसच्याच लोकप्रतिनिधीने योजना मंजूर केली. खा.डॉ हिना गावित यांनी योजनेचे श्रेय घ्यावे पण, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत नंदुरबार पालिकेच्या १०५ पात्र लाभार्थ्यांची यादी यापूर्वीच मंजूर झालेली असल्याचे रघुवंशी म्हणाले.
पात्र लाभार्थ्यांची बैठक
नगरपरिषदेची पंतप्रधान आवास योजना लागू झाले आहे ज्या नागरिकांची स्वतःच्या मालकीची जागा शहरात आहे अशा 105 घरकुलांच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांची छत्रपती शिवाजी महाराज मंदिराशेजारील डॉममध्ये बैठक घेण्यात आली यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थितांना योजनेची माहिती दिली यावेळी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक कुणाल वसावे,दीपक दिघे,फारुख मेमन आदी उपस्थित होते.
बांधकामाची परवानगी घ्यावी
योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करुन घरकुल बांधकामासाठी नगरपरिषदेकडून रीतसर परवानगी घ्यावी. विनापरवानगी बांधकाम करू नये. पालिकेचे कर्मचारी नागरिकांना सहकार्य करतील. लाभार्थ्यांनी लवकर घरकुलाचे बांधकाम करावे असे आवाहन माजी आमदार रघुवंशी यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेला प्रारंभ नगरसेवक यशवर्धन रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

Next Post

खान्देश साहित्य संघाचे पहिले बहुभाषिक संमेलन जळगावात

Next Post
खान्देश साहित्य संघाचे पहिले बहुभाषिक संमेलन जळगावात

खान्देश साहित्य संघाचे पहिले बहुभाषिक संमेलन जळगावात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026
जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

July 18, 2026
राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

July 17, 2026
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

July 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add