नवापूर | प्रतिनिधी-
नवापूर तालुक्यातील बोकलझर येथे आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी बांधवाना जि.प सदस्य भरत गावीत यांचा हस्ते खावटी किट वाटप करण्यात आली.
यावेळी बोकलझर गावाचे सरपंच राहुल गावीत,माजी सरपंच मोल्या गावीत,दिनकर गावीत,जयराम गावीत,ग्रामसेवक काशीराम थवील,शिक्षक अनिल पाटील, अल्का पाटील सह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी जि.प सदस्य भरत गावीत म्हणाले की, कोरोना महामारीत संपुर्ण देश लॉकडाऊन होता त्यावेळी आदिवासी बांधवाना राहत मिळावी म्हणून आदिवासी विकास विभामार्फेत ही योजना आहे.कोरोना महामारी अजुन गेलेली नसुन सर्व ग्रामस्थ यांनी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे.मी स्वता जेष्ठ नागरीकांन साठी एस टी प्रवासासाठी सवलत पास काढण्यासाठी एक उपक्रम राबवित आहे यासाठी सर्व जेष्ठ नागरीकांनी याचा लाभ घ्या.असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक अनिल पाटील यांनी केले तर आभार शिक्षक सौ उल्का पाटील यांनी मानले.यावेळी बोकलझर गावात ७६ लाभार्थीना खावटी किट वाटप करण्यात आली आहे.या नंतर प्रा.आ.केंद्र प्रतापूर अंतर्गत बोकलझर येथे कोविड-१९ लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.डॉ वंदना मावची, बी एन भावसार,श्रीमती एस.जी.गावीत,श्रीमती एस.आर.गावीत, युवराज कुंवर यांनी लसीकरण करणासाठी परीश्रम घेतले.