नंदुरबार l प्रतिनिधी
शासकीय आश्रम शाळेतील अधिक्षेकचा विनयभंग करणारा शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र मुसळे वर निलंबनाची कारवाई आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तांनी निलंबित केले.
नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची सहल काढण्यात आली होती. या सहली दरम्यान नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कार्यालयात कार्यालयात शिक्षण विस्तार अधिकारी असलेल्या राजेंद्र मुसळे यांनी प्रवासादरम्यान शहादा तालुक्यातील एका आश्रम शाळेवर कार्यरत असलेल्या महिला वस्तीगृह अधिक्षिकेचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली होती.
याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस स्टेशनला शहादा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षण विस्तार अधिकारी मुसळे यांना अटक करून न्यायालयात हजर केलं होत.त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता . मात्र आदिवासी विकास विभागाच्या वतीने या अधिकाऱ्याची विभागीय चौकशीही करण्यात येऊन त्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार नंदुरबार आदिवासी विकास विभागाच्या चौकशीत मुसळे प्रथम दर्शनी दोषी असल्याचे दिसून येत असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर अप्पर आयुक्त यांनी त्यांना निलंबित केलं आहे. या प्रकरणांमध्ये सहलीला गेलेल्या आणखी काही मुलींचा विनयभंग केल्याची तक्रार समोर आली असून यंत्रणाकडून अधिक तपास सुरू आहे.








