नंदूरबार l प्रतिनिधी
आ. राजेश पाडवी यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले असून आपल्या वाहनात विद्यार्थ्यांना परीक्षा ठिकाणी शाळेत वेळेवर पोचविले.

शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी हे शहादा येथून कार्यक्रम आटोपून बोरद मार्गे परतत असताना मोड कडेल दरम्यान बस नादुरुस्त झाल्याने विद्यार्थी रस्त्यावर तात्काळ उभे होते. आमदार यांनी गाडी थांबवत विचारणा केली.
विद्यार्थ्यांनी आमदारांना बस बंद पडली परीक्षेची वेळ होत आली आहे असे सांगितले, आमदार राजेश पाडवी यांनी तात्काळ तीन-चार खाजगी वाहने मागून 50 च्या वर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पाठविले. तळवे रस्त्यावरील काही गावात या बसची येण्याची प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना रिक्षा केली.
व काही विद्यार्थ्यांना आपल्या गाडी बसवेत शाळेतील परीक्षा केंद्रावर पोचविले. आमदार राजेश पाडवी यांनी सतर्क व मदतीचे कार्याने विद्यार्थी परीक्षेत वेळेवर पोहोचल्याने शैक्षणिक नुकसान ठरले आमदारांचे या मदत कार्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.








