नंदुरबार l
तालुक्यातील धवळीपाडा ते कोकणीपाडा रस्त्यावर ॲपेरिक्षाने रिक्षाला धडक दिल्याने सहा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ॲपेरिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील धवळीपाडा ते कोकणीपाडा रस्त्यावर ॲपेरिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातील ॲपेरिक्षा (क्र.जी.जे. ५ एझेड ८१११) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात ॲपेरिक्षा चालवून वडझाकण शिवारात समोरुन येणाऱ्या रिक्षाला धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात राजू टेट्या प्रधान, वसंती अर्जुन पाडवी, शिवूबाई ईमा प्रधान, संगिताबाई दिलवर प्रधान, रमिला रोहिदास प्रधान सर्व रा.धवळीपाडा ता.नवापूर व गोविंद खाड्या वळवी रा.मोगराणी ता.नवापूर हे जखमी झाले.
अपघातानंतर ॲपेरिक्षा चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत राजू टेट्या प्रधान यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात ॲपेरिक्षा चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्ष केशव गावीत करीत आहेत.








