नंदुरबार l
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट -ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ आज ९ उपकेंद्रांवर सुरळीत पार पडली. या परीक्षेसाठी एकुन ३ हजार ६२१ परीक्षार्थी परीक्षेला बसले होते.पैकी २ हजार ८३४ उपस्थीत होते तर ७८७ उमेदवार गैरहजर होते. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.
शहरातील श्रीमती एच.जी. श्रॉफ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, मोठा मारुती मंदिराजवळ, नंदुरबार, जी.टी.पाटील महाविद्यालय,आय.टी.आय.जवळ, शनि मंदिर रोड, नंदुरबार, श्रीमती. डी.आर.हायस्कुल व ज्युनियर कॉलेज,मुख्य पोस्ट कार्यालय जवळ,नंदुरबार, कमला नेहरु कन्या विद्यालय, नेहरु चौक, स्टेशन रोड, नंदुरबार, एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर,ज्युनियर कॉलेज, नंदुरबार, एस.ए.मिशन,मराठी उच्च माध्यमिक विद्यालय, तळोदा रोड,नंदुरबार, एस.ए.मिशन इंग्रजी उच्च माध्यमिक विद्यालय,तळोदा रोड, नंदुरबार, सह.महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील माध्यमिक विद्यालय,साक्री नवापूर रोड, नंदुरबार, डॉ.काणे गर्ल्स हायस्कुल, मुख्य पोस्ट कार्यालय जवळ,नंदुरबार अशा ९ उपकेंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली.
सदर परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात काल दि.८ ऑक्टोंबर सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत परिक्षेसाठी संबंधीत नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेशास बंदी होती.
काल झालेल्या परीक्षा ९ उपकेंद्रांवर सुरळीत पार पडली.
यात श्रीमती एच.जी. श्रॉफ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ४५६ उमेदवारांपैकी ३५५ हजर १०१ गैरहजर, जी.टी.पाटील महाविद्यालय ४५६ उमेदवारांपैकी ३६३ हजर ९३ गैरहजर, श्रीमती. डी.आर.हायस्कुल व ज्युनियर कॉलेज ३८४ उमेदवारांपैकी ३०८ हजर ७६ गैरहजर, कमला नेहरु कन्या विद्यालय ४८० उमेदवारांपैकी ३६२ हजर ११८ गैरहजर, एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर,ज्युनियर कॉलेज ३३६ उमेदवारांपैकी २७४ हजर ६२ गैरहजर, एस.ए.मिशन,मराठी उच्च माध्यमिक विद्यालय ४५६ उमेदवारांपैकी ३५६ हजर १०० गैरहजर, एस.ए.मिशन इंग्रजी उच्च माध्यमिक विद्यालय ४५६ उमेदवारांपैकी ३४४ हजर ११२ गैरहजर,सह.महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील माध्यमिक विद्यालय २८८ उमेदवारांपैकी २३० हजर ५८ गैरहजर, डॉ. काणे गर्ल हायस्कुल ३०९ उमेदवारांपैकी २४२ हजर ६७ गैरहजर होते.
या परीक्षेसाठी एकुन ३ हजार ६२१ परीक्षार्थी परीक्षेला बसले होते.पैकी २ हजार ८३४ उपस्थीत होते तर ७८७ उमेदवार गैरहजर होते. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला हेता.








