शहादा l प्रतिनिधी
स्व.अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या जयंतीनिमित्त दि 8 ऑक्टोबर 2022 रोजी पी.के. अण्णा पाटील फाउंडेशन, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व व्हीएसजीजीएम यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या सहयोगाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात झालेल्या या रक्तदान शिबिरात 210 व्यक्तींनी सहभाग नोंदवला व पात्र 173 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, परिसरातील नागरिक, रासेयो स्वयंसेवक, छात्र यांनी उस्फूर्तपणे रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ संपन्न झाला.सदर शिबिरात खा.डाॅ. हिना गावित,माधव पाटील, सुनिल पाटील,विजय विठ्ठल पाटील,विजय दामू पाटील, रविंद्र रावल, जगदीश पाटील,अनिल भामरे, विनोद जैन,
श्रीमती कमलताई पाटील,नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील पाटील, माधवी पाटील,आदिंनी शिबीर स्थळी भेट दिली. मंडळाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांनीही रक्तदान करून सर्वांचा उत्साह वाढवला.








