नंदुरबार l
हिंदु सेवा सहाय्य समितीने गेल्या दोन वर्षापासून जुनी नगरपालिका स्थित शिवछत्रपतींचा स्मारकावर दररोज सकाळी ७:३० वाजता नित्य अभिषेक पूजन सुरू केले आहे. या सेवेला द्विवर्षपुर्ती निमित्ताने शिवछत्रपती पुतळ्याचे वेदमंत्रांचा घोषात सामूहिक अभिषेक-पूजन कार्यक्रम तिथीनुसार आश्विन मास. शु.प. एकादशी रोजी करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात शिवछत्रपतींचा पूर्ण घोषणाने बालधारकरी विनायक राजपूत याने करून आकाश गावित यांनी प्रेरणामंत्राने सुरुवात केली. धर्मसेवक डॉ नरेंद्र पाटील यांनी उपक्रम सुरू करण्याचा उद्देशात सांगितले की, ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले अश्या महान शिवछत्रपतींचे स्मरणाने दिवसाची सुरुवात हिंदूंनी करावी, महाराजांचा पुतळ्याची नित्य सेवा व्हावी याउद्देशाने गेल्या दोन वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता काही शिवभक्त एकत्रित येऊन दररोज सकाळी ७:३० वाजता जुनी नगरपालिका स्थित शिवस्मारकावर नित्य अभिषेक-पूजन करत आहोत,तरी सर्व शिवभक्तांनी अभिषेक पूजनासाठी दररोज उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे वेदमंत्रांचा जयघोषात दूधाभिषेक, सुगंधी द्रव्यांनी जलाभिषेक हरिष हराळे, मुकेश घाटे, निलेश जगताप याशिवभक्तांनी केले. माल्यार्पण संतोष जैन, चेतन राजपूत यांनी केले महाराजांची आरती ऍड देवेंद्र मराठे यांनी तर ध्येय मंत्र जितेंद्र मराठे यांनी घेतले.
कार्यक्रमाची सांगता हिंदु जनजागृती समितीचे आकाश गावित हिंदुराष्ट्राची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजू चौधरी यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त, हिंदुत्ववादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवकांनी परिश्रम घेतले.








