नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरुन पोलीस अमंलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असतात, त्यामुळे जे अमंलदार वर्षानूवर्षे पोलीस दलात परिश्रम केल्यानंतर वेळेवर पदोन्नती मिळणे हा पोलीस दलातील प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा अधिकारी आहे. एखाद्या पदावर कार्यरत असतांना पदोन्नती हा विषय प्रत्येक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे दृष्टीने महत्वाची बाब असते.
त्यामुळे पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या पोलीस अमलदारांची यादी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी मंत्रालयीन कर्मचारी यांच्याकडून घेतली. तसेच रिक्त होणाऱ्या जागेवर पदोन्नतीस पात्र असलेल्या अमंलदारांना तात्काळ पदोन्नती देणेबाबतच्या सूचना मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच पदोन्नतीस पात्र असणाऱ्या अमलदारांना आज दि. 7 ऑक्टोंबर 2022 रोजी पोलीस अधीक्षक यांचे दालनात उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते.

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पदोन्नती देणाऱ्या संबंधीत शाखेचे नंदुरबार जिल्ह्यातील पदोन्नतीस सेवाजेष्ठतेनूसार पात्र असलेल्या सर्व पोलीस अमंलदारांना पदोन्नती दिलेल्या होत्या. त्याबाबतची सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करुन 5 पोलीस हवालदार यांना सहा. पोलीस उप निरीक्षक व 06 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर सेवा जेष्ठतेनूसार पदोन्नती देण्यात आली.
पदोन्नती झालेल्या जिल्ह्यातील 11 पोलीस अमंलदारांना पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे एक छोटेखानी पण दिमाखदार कार्यक्रम आयोजन करुन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्वतः पदोन्नती झालेल्या पोलीस अमलदारांना सहा. पोलीस उप निरीक्षक पदाचे एक स्टार व पोलीस हवालदार पदाची फित लावून पोलीस अमंलदारांचे अभिनंदन केले व पोलीस दलातील पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी मागील एक वर्षाच्या काळात जिल्हा घटकाच्या आस्थापनेवरील पोलीस अमलदारांपैकी पोलीस शिपाई पदावरुन पोलीस नाईक पदावर 71, पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर 60 तर पोलीस हवालदार पदावरुन सहा. पोलीस उप निरीक्षक पदावर-47 अशा एकुण 178 पोलीस अमलदारांना पदोन्नतीची भेट दिली असून आज दि
7 ऑक्टोंबर 2022 रोजी 11 पोलीस अंमलदारांना
पदोन्नती देण्यात आली. तसेच पदोन्नती मिळाल्यानंतर मिळणारे वेतन व भत्ते याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी यावेळी सांगितले.
पोलीस हवालदार पदावरून सहा. पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झालेले पोलीस अमलदार
1) पो. ह.रविन्द्र आनंदा माळी, 2) पो. ह. गवसराम बंजी गवळी, 3) पो. ह.शिवाजी बन्सीलाल सोनवणे, 4) पो. ह. रतन ओंकार पावरा,5) पो. ह. गुलाब भामट्या वळवी
पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झालेले पोलीस अमलदार
1) पो. ना.नितीन नरशी नाईक, 2) पो. ना.ज्ञानेश्वर गोरख लामगे, 3) पो. ना.अमोल सुकलाल मराठे, 4) पो. ना.निलेश हिम्मतराव पाटील, 5 ) पो. ना. स्वप्नील रमेशगिरी गोसावी, 6) पो. ना.राजेंद्रकुमार रावजी गावीत.








