नंदुरबार l
शहरातील नुतन हायस्कुल जवळील इलेक्ट्रिक दुकान फोडून चोरट्याने दीड लाख रुपये किंमतीची रोकड लंपास केल्याची घटना घडली.
नंदुरबार येथील महेशकुमार लेखराज नानकाणी यांचे शहरातील नुतन हायस्कुल समोरील जयहिंद इलेक्ट्रिकल दुकान आहे. सदर दुकान फोडून चोरट्याने प्रवेश करुन दीड लाख रुपयांची रोकड चोरुन नेली.
याबाबत महेशकुमार नानकाणी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५४, ५४७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.बी.मोहिते करीत आहेत.