शहादा l प्रतिनिधी
नंदुरबारचे पालकमंत्री ना.डॉ. विजयकुमार गावित यांच्या नागरी सत्काराचे आयोजन येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात दि.9 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदिवासी विकास मंत्री व नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल ना.डॉ. विजयकुमार गावित यांचा नागरी सत्कार शहादा तळोदा मतदारसंघाचे आ. राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.रविवार दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमास खा. डॉ. हिनाताई गावित, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या सचिव श्रीमती कमलताई पाटील, पंचायत समिती शहादाच्या सभापती बायजाबाई भील,
जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील सखाराम पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम तुकाराम पाटील, शहादा तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रवींद्र रावल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या जाहीर नागरी सत्कार समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी केले आहे.








