नंदुरबार l
शहादा तालुक्यातील मोहिदा येथील ग्रामीण रुग्णालय चोरट्यांनी फोडून एसीससह फॅन असा सुमारे २५ हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरुन नेले.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील मोहिदा येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर आहे. सदर कोविड सेंटरच्या खोलीची मागील खिडकी उघडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.
सदर खोलीत असलेला २३ हजार रुपये किंमतीचा ए.सी. व १४०० रुपये किंमतीचे २ फॅन असा एकूण २४ हजार ४०० रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेले. याबाबत नरेश दिलीप गवळे यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अशोक कोकळी करीत आहेत.








