नंदूरबार l प्रतिनिधी
चिखली मोशी (पुणे ) गुजर मित्र परिवार आयोजित केदारेश्वर प्रतिष्ठान/साईरंग फाऊंडेशन माध्यमातून शहादा व परिसरातील गुजर बंधू भगीनींसाठी ३ दिवसीय गरबा दांडियाचे आयोजन करण्यात आले होते.

ह्या कार्यक्रमासाठी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी ऊपस्थिती लावली, ३ दिवस सर्वांनी पुण्यात राहून गावाकडचा आनंद घेतला.या कार्यक्रमाचे यु ट्युब चॅनेल वर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुयश ग्रुप,ज्ञानेश्वर बोऱ्हाडे,व गुजर मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले.








