नंदुरबार l
शहरातील खोडाई माता यात्रेत फिरत असतांना युवतीच्या गळ्यातून लॉकेट चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील सुप्रिया नगर येथील रुपाली अनिल देशमुख ही युवती खोडाई माता यात्रेत फिरण्यासाठी गेली होती.
यावेळी अज्ञाताने तिच्या गळ्यातून ४ हजार रुपये किंमतीचे १ ग्रॅम सोन्याचे लॉकेट चोरुन नेले. याबाबत रुपाली देशमुख यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्वप्निल पगारे करीत आहेत.








