नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा येथील एलआयसी ऑफिसजवळ कोणत्या महिलेशी बोलत असल्याची विचारणा केल्याच्या रागातून पतीने पत्नीला दुखापत करण्याच्या उद्देशाने सॅनिटायझर द्रव्य पाजून मारहाण केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , शहादा येथील भावसार मढीतील प्रणाली विशाल भावसार यांनी पती विशाल ईश्वर भावसार यांना तुम्ही कोणत्या महिलेशी बोलत असल्याची विचारणा केली . याचा राग आल्याने विशाल भावसार याने प्रणाली भावसार यांना दुखापत करण्याच्या उद्देशाने सॅनिटायझर द्रव्य पाजले . तसेच शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण व जिवेठार मारण्याची धमकी दिली . याबाबत प्रणाली भावसार यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलसि ठाण्यात विशाल भावसार याच्याविरोधात भादंवि कलम ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल आहे . पुढील तपास पोहेकॉ.वळवी करीत आहेत .