मुंबई | प्रतिनिधी
शिंदे- फडणवीस सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील गोरगरीब जनतेची यंदाची दिवाळी गोड करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देतांना सांगितले की, दारिद्रयरेषेखालील (BPL) तब्बल १ कोटी ६२ लाख ४२ हजार रेशनकार्ड धारकांना अल्पदरात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य दिले जाईल. यात रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल यासह आदी वस्तूंचा समावेश असेल. यामुळे सरकारी तिजोरीवर सुमारे ५०० कोटींचा आर्थिक भार पडणार आहे.
१ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ होणार असून रवा, चणाडाळ, साखर व तेल ( प्रत्येकी एक किलो पॅकेज) केवळ शंभर रुपयांत मिळणार आहेत.








