नंदूरबार l प्रतिनिधी
स्वच्छता पंधरवडा निमित्त राष्ट्रीय छत्र सेना व कनिष्ठ व वरिष्ठ राष्ट्रीय सेवा योजना एकक, विद्यार्थी विकास विभागातील छात्रसैनिक व स्वयंसेवकांनी स्वच्छतेचा संदेश दिला.
49 महाराष्ट्र बटालियन, जी.टी. पाटील महाविद्यालय, डी.आर.विद्यालय व एकलव्य विद्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ.एम.जे. रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थित स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. डॉ. रघुवंशी यांनी स्वच्छ भारत हीच भारताची ओळख झाली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. असे स्वयंसेवकांना आवाहन केले.
उपप्राचार्य एन.जे. सोमानी, सुभेदार तिवारी, शांताराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यानंतर खोडाई माता मंदिर परिसरातील निर्माल्य संकलन करण्यात आले त्याचबरोबर प्लास्टिक घनकचरा हा देखील गोळा करून प्रत्येक दुकानदारास स्वच्छतेचा संदेश देऊन जागृती करण्यात आली. स्वच्छ भारत निरोगी भारत, स्वच्छ भारत निर्मल भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत या घोषणांनी मंदिर परिसरात आलेल्या भाविकांना स्वच्छतेचा संदेश घेऊन जनजागृती करण्यात आली.
समारोपास नंदुरबार शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी स्वयंसेवकाचे कौतुक केलं. भारताचे भविष्य आपल्या हातात आहे असं आवाहन स्वयंसेवकांना केले.अभियानाचे प्रास्ताविक लेफ्ट. विजय चौधरी यांनी केले. तर स्वच्छतेची शपथ डॉ. मनोज शेवाळे यांनी दिली. स्वच्छता अभियानाचे संचालन कॅप्ट.राहुल पाटील व एन.सी.सी. अधिकारी आंधळे यांनी केले.
या अभियानात एकूण 306 छात्र सैनिक व स्वयंसेवक सहभागी झाले. अभियान यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.माधव कदम, कार्यक्रमाधिकारी डॉ. दिनेश देवरे, डॉ. उपेंद्र धगधगे यांनी परिश्रम घेतले.








