नंदुरबार l
येथील श्रीमती डी आर हायस्कूल येथे आज महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ अंतर्गत नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ व जिल्हास्तरीय गणितीय कार्यशाळा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय मच्छिंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाचे कार्यवाह शिवशरण बिराजदार, ज्येष्ठ गणिततज्ञ प्राचार्य नानासाहेब लामखेडे, नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन ॲड. परीक्षित मोडक, डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी, उपशिक्षणाधिकारी आर.बी. पाटील जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेन्द्र रघुवंशी, कार्याध्यक्ष कुंदन पाटील डी आर हायस्कूलचे मुख्याध्यापक नारायण भदाणे, डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सीमा मोडक, विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका सुलभा महिरे, उपप्राचार्य मोहन अहिरराव, पर्यवेक्षक श्रीराम मोडक, पंकज पाठक तसेच नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांनी डी.आर. हायस्कूलच्या प्रांगणात सरस्वती पूजन केले. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातून आलेल्या सर्व गणित शिक्षकांसाठी आयोजित खुले पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले मग डी.आर. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध गणितीय शैक्षणिक साधनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन सुद्धा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. मुख्य कार्यक्रमात दीप प्रज्वलन, गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन व चित्रकला शिक्षक देवेंद्र कुलकर्णी यांनी साकारलेले रांगोळी मधील रामानुजन यांचे पोट्रेट कार्यक्रमाचे आकर्षण बिंदू ठरले.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात प्राचार्य नानासाहेब लामखेडे यांनी महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाचा 1976 पासून आज पर्यंतचा कार्याचा आढावा घेतला. महामंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या गणित संबोध, गणित प्राविण्य, गणित प्रज्ञा व गणित पारंगत परीक्षा यांची सविस्तर माहिती जिल्ह्यातून आलेल्या सर्व गणित शिक्षकांना दिली व महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ अंतर्गत नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळ स्थापन झाले असून गणिताची ज्ञानगंगा आता नंदुरबार जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहोचणार असल्याचे सांगितले.
पाहुण्यांचा परिचय व सत्कार योगेशकुमार गवते यांनी केला. नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळा तर्फे योगेशकुमार गवते यांची नियुक्ती जाहिर करण्यात आली तर उपाध्यक्षपदी मुकेश शहा, सुरेश लोहार, दिनेश वाडेकर, सचिव पदी दिलीप पाटील, सहसचिव पदी कल्पेश तांबोळी, सतीश पाटील, दर्शन अग्रवाल तर कार्यकारणी सदस्य पदी अनिल नाईक, प्रमोद शिंदे, सचिन पंचभाई, मेघशाम धनगर, कल्पेश थेटे, संदीप शिवदे, चेतन पाटील, सुभाष भोई, धीरज हाटकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते या 17 ही लोकांचा राज्य मंडळाचे प्रमाणपत्र, शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
अध्यक्षीय समारोप मध्ये शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम साहेब यांनी नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळ स्थापन झाल्याचा आनंद आहे. या निमित्ताने जिल्ह्यात गणिताची ज्ञानगंगा कानाकोपऱ्यात पोहोचेल, गणिताबद्दलची अवास्तव भीती दूर होईल, प्रत्येक शिक्षकाने गणिताचा बाहू न करता गणित किती सोपे साधे आणि सरळ आहे ते उलगडून विद्यार्थ्यांना सांगावे व जशी गणिताची संघटना स्थापन झाली त्याच पद्धतीने इंग्रजी हा महत्त्वाच्या विषयाची संघटना सुद्धा नंदुरबार जिल्ह्यात स्थापन व्हायला हवी अशी इच्छा प्रकट केली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिनेश वाडेकर यांनी तर सूत्रसंचालन योगिता साळी यांनी केले. जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या दुपारच्या सत्रामध्ये महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार प्राचार्य नानासाहेब लामखेडे यांनी आनंददायी गणित तर कार्यवाह शिवशरण बिराजदार यांनी गणितातील सौंदर्य स्थाने यावर एलसीडी प्रोजेक्ट, खडू फळा यांचा वापर करून संपूर्ण गणित शिक्षकांचे मनोरंजन तर केले मात्र त्याच बरोबर बौद्धिक सुद्धा शिक्षकांना दिले.
शेवटी समारोप कार्यक्रमांमध्ये नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष श्री योगेशकुमार गवते यांनी जिल्ह्यामध्ये गणित संबोध, गणित प्राविण्य, गणित प्रज्ञा व गणित पारंगत परीक्षा इयत्ता पाचवी आठवी आणि दहावीसाठी कशा राबवायच्या, शिक्षकांनी कशा पद्धतीने नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळ शी जुळायचे व भविष्यात उपक्रमशील उत्साही शिक्षकांनी नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळाशी जुळून तालुकास्तरीय गणित अध्यापक मंडळात सहभागी व्हावे असे आवाहन केले
शेवटी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात सहभागी असलेले डी.आर. हायस्कूलचे विद्यार्थी तसेच जिल्हास्तरीय कार्यशाळा यशस्वी करणारे शिक्षक हेमंत खैरनार, निलेश गवित,राहुल पाटील ,जगदीश बच्छाव, भरत पेंढारकर, प्रशांत पाठक, पी. एम.पाटील, जयेश देवरे, योगिता साळी, दिपाली भदाणे, शितल जोशी, दुर्गा परदेशी , कमल चौरे, सुनीता बागुल ,धनगौरी पाडवी, संजय फुलंब्रीकर आदींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी.आर. हायस्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.








