नंदुरबार l
शहादा शहरातील बोहरा कॉलनीत चोरट्यांनी हार्डवेअर दुकान फोडून फिटींगचे मटेरियल चोरुन नेले.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा येथील मुस्तफा जफर हुसेन यांचे बोहरा कॉलनीत तुरबी ट्रेडर्स नावाचे हार्डवेअर दुकान आहे.
सदर दुकानाच्या मागील पत्रा उचकावून चोरट्यांनी आत प्रवेश करुन ६० हजार रुपये किंमतीचे ब्रास फिटींगचे मटेरियल चोरुन नेले. याबाबत मुस्तफा जफर हुसेन यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४६१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक छगन चव्हाण करीत आहेत.








