नंदुरबार l
तालुक्यातील वाघोदा शिवारातील राज सिटी २ मध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील वाघोदा शिवारात राज सिटी २ आहे. सदर राज सिटी २ मधील एका बंद घराच्या अंगणरात आंबालाल सदा पाडवी (रा.राकसवाडे ता.नंदुरबार) हा चोरी करण्याच्या उद्देशाने आढळून आला.
पोलिसांनी त्याच्याकडून एक लोखंडी पकड व एक स्क्रू-चावी जप्त केली आहे. याबाबत चापोहेकॉ. सतिष ढोले यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात आंबालाल पाडवी याच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.पितांबर जगदाळे करीत आहेत.








