Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अकोल्याहुन आलेल्यांनी केली खोडाई माता यात्रौत्सवात चोरी,१३ सोन्याचे लॉकेटसह २ संशयीत महिलांना अटक

team by team
October 2, 2022
in क्राईम
0
अकोल्याहुन आलेल्यांनी केली खोडाई माता यात्रौत्सवात चोरी,१३ सोन्याचे लॉकेटसह २ संशयीत महिलांना अटक
नंदुरबार |  प्रतिनिधी
नंदुरबार येथील खोडाई माता यात्रौत्सवात चोरी करणार्‍या २ संशयीत महिलांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात घेतले असुन १३ सोन्याचे लॉकेट हस्तगत करण्यात आले आहे.
याबाबात अधिक माहिती अशी कि, १ ऑक्टोंबर रोजी रात्री ९ वा. सुमारास विकास निंबा धनगर रा. नितीन साहित्य नगर, नंदुरबार हे त्यांच्या पत्नी, मुलगीसह नंदुरबार शहरातील खोडाई माता यात्रौत्सव पाहण्यासाठी गेले असता त्यांची ३ वर्ष वयाची मुलगी हिच्या गळ्यातील ४ हजार ७०० रु. कि.चे अंदाजे १ ग्रॅम वजनाचे काळ्या दोर्‍यातील सोन्याचे ओम पान चोरी झाल्याचे त्यांचे लक्षात आल्याने त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे जावून तक्रार दिल्याने भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशीत केले.नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदीर परिसरातील खदान भिलाटीत दोन पुरुष व दोन महिला हे संशयास्पदरित्या फिरत आहे. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सदर बातमीची खात्री करुन कायदेशीर कारवाई करण्याबाबत त्यांनी आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदीर परिसरातील खदान भिलाटीत मिळालेल्या बातमीमधील दोन पुरुष व दोन महिलांचा शोध घेतला असता दोन पुरुष व दोन महिला हे खदान भिलाटी परिसरात संशयीतरीत्या फिरतांना दिसून आले. सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला असता पुरुषांना त्याबाबत संशय आला व ते पळून जाण्यात यशस्वी झाले.
त्यातील दोन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला पोलीस अमलदारांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या दोन्ही महिलांना त्यांचे नांव गांव विचारले असता त्या उडवा उडवीची उत्तरे देवू लागले, म्हणून त्यांना महिला पोलीस अमलदारांनी स्थानिक गुन्हे शाखेत आणून विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी त्यांची खरे नावे सांगून त्या अकोला जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. ताब्यातघेतलेल्या दोन्ही महिलांना सखोल विचारपूस केली असता त्या त्यांच्या नातेवाईकांसह मागील ३ ते ४ दिवसापासून नंदुरबार येथे आल्या असून शहरातील खोडाई माता यात्रेतून रात्रीच्या वेळेसे गर्दीचा फायदा घेवून लहान मुले, मुलींच्या गळ्यातील सोन्याचे वस्तूंची चोरी करीत असल्याचे सांगितले.
सदर महिलांच्या ताब्यात असलेल्या पिशव्यांची पाहणी केली असता त्यात ५४ हजार ६३२ रुपये किमतीचे १३ सोन्याचे लॉकेट व २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकुण ७४ हजार ६३२ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदरच्या सोन्याच्या वस्तु व मोबाईल त्यांनी खोडाई माता परिसरातून चोरी केल्याचे सांगितले. सदरचा मुद्देमाल हा कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही महिला व मुद्देमाल गुन्ह्याचा तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, महिला विजया बोराडे, प्रमिला वळवी, प्रिती गावीत, अरुणा मावची, राकेश मोरे, मोहन ढमढेरे, रमेश साळुंखे, अभय राजपुत, आनंदा मराठे यांचे पथकाने केली आहे.
ज्या भाविकांचे मुले, मुलींच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खोडाई माता यात्रौत्सावातून चोरी झालेले असतील त्यांनी तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा. तसेच यावर्षी नंदुरबार शहरातील खोडाई माता यात्रौत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून सर्व भाविकांनी आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या व चोरांपासून सावध राहा.असे आवाहन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

असली व रामसुला येथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Next Post

वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक

Next Post
वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक

वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add