धडगाव तालुक्यातील असली, माथा असली व रामसुला येथील कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख आ.आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
असली व रामसुला येथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्ष प्रवेशाने माजी मंत्री तथा आ.के.सी.पाडवी यांच्या गडमध्ये खिंडार पाडण्यात आ.आमश्या पाडवी यांना यश आले आहे.
असली व रामसुला येथे ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेचे स्वतंत्र पॅनेल निवडणूक लढवत आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जि. प.कृषी सभापती गणेश पराडके, शिवसेना जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, धडगाव तालुकाप्रमुख महेश पाडवी, मोहन महाराज सह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते








