नंदुरबार l
शहादा शहरातील क्रांती चौकात बांधकामाचे साहित्य न उचलल्याचा राग आल्याने पोटावर चाकूने वार करीत जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा शहरातील क्रांती चौक येथील सुनिल भाईदास चौधरी यांनी बांधकामाचे साहित्य उचलले नाही. याचा राग आल्याने सुनिल चौधरी यांच्या डोळ्यात दिनेश चतुर भावसार याने मिरची पूड फेकली.
तसेच चाकूने पोटावर वार करुन त्यांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत शितल सुनिल चौधरी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात दिनेश भावसार याच्याविरोधात भादंवि कलम ३०७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप आरक करीत आहेत.








