नंदुरबार l प्रतिनिधी
सेंट्रल रेल्वे बोर्डाने दिलेल्या आदेशानुसार सेवा पंधरवडा अंतर्गत नंदुरबार रेल्वे विभागाद्वारे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून शिबिर यशस्वी केले.याप्रसंगी नंदुरबार रेल्वे विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आयेशा, अमितकुमार साहू, डॉ.सायली मोडक, डॉ.रामा वडीकेअर, प्रदीप कुमार, अनिल रामटेके, विजयकुमार पांडे ,नीरज निराला, आदींसह भारत स्काऊट गाईड नंदुरबार शाखेचे सर्व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.








