Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सावधान : बुक केलेल्या गाडीची डिलीवरी मिळण्यासाठी ९० हजारात फसवणूक

team by team
October 1, 2022
in क्राईम
0
सावधान : बुक केलेल्या गाडीची डिलीवरी मिळण्यासाठी ९० हजारात फसवणूक

नंदुरबार | प्रतिनिधी-

 

बुक केलेल्या ओला कंपनीची गाडीची डिलीव्हरी मिळण्यासाठी अज्ञात इसमाने खोटी कारणे सांगून करणखेडा ता.नंदुरबार येथील मनेश अशोक पाटील यांची ८९ हजार ५०० रुपयांत फसवणूक केल्याची घटना घडली. याबाबत अज्ञात इसमाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास करणखेडा (ता.नंदुरबार) येथील मनेश यांनी ओला कंपनीची बुकिंग केलेली मोटारसायकल किती दिवसात भेटेल याबाबत त्यांच्या मोबाईलवरुन गुगल ऍपवर OL­A वेबसाईट सर्च करून सदर कंपनीचा मोबाईल नंबर ८१४५२५५९५६ प्राप्त केल्या.

 

 

त्याच्यावर फोन करून त्यांनी एक वर्षापुर्वी ४९९ रुपये भरून बुकिंग केलेली ओला कंपनीची मोटारसायकल किती दिवसात मिळेल, याबाबत विचारणा केली. त्यावर समोरील अज्ञात व्यक्तीने तुमची मोटरसायकल ऑनलाईन बुकिंग झालेली आहे.

 

 

सदर मोटरसायकल एक लाख रुपये किमतीची आहे. परंतु सध्या ऑफर सुरु असून त्यातून १० हजार रुपये सबसिडी देण्यात आली आहे. तसेच तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलेले ४९९ रुपये कापून ८१ हजार ५०० रुपये माझ्या अंकाउंटवर गुगल पे, फोन पे, YONO ऍपद्वारे पाठवून द्या, असे सांगितले.

 

 

त्यामुळे पाटील यांनी एवढी मोठी रक्कम सदर ऍपवर पाठवता येत नाही असे सांगितल्याने त्याने त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली, ती ओपन करून सदर अकाउंटवर RTGS ने किंवा NEFT ने तुम्ही ८९ हजार ५०० रुपये पाठवून द्या असे सांगितले.

 

 

त्यामुळे पाटील यांनी लागलीच स्टेट बँक शाखा गुजर जांभोली ता.जि.नंदुरबार येथे जावून चेकने कोरामंगला बँक बँगलोर खाते क्र.११००६८०९७३०७ या खात्यात RTGS ने पाठविले.समोरील व्यक्तीने पाटील यांना पैसे पाठविल्याची स्लिप व्हॉट्सऍपवर पाठवली.

 

 

व फिर्यादीस सायंकाळी ४.३० वाजेदरम्यान परत फोन करून सांगितले की तुमच्या मोटार सायकलच्या रजिस्ट्रेेशनसाठी १८ हजार ९९९ रुपये परत टाका असे सांगितल्याने पाटील यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

 

याबाबत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक प्रविण कोळी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणार्‍या पोलीस निरीक्षक बकाले यांच्या कायमस्वरूपी निलंबनासाठी नितीन जगताप यांचे परिवारासह उपोषण सुरू

Next Post

राज्यभरात “हॅलो नव्हे – वंदे मातरम्”

Next Post
राज्यभरात “हॅलो नव्हे – वंदे मातरम्”

राज्यभरात "हॅलो नव्हे - वंदे मातरम्"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add