तळोदा | प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील लक्कडकोट येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल ग्राम समिती बैठक दि.२७ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीच्या सुरुवातीला भारत माता व देव मोगरा माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे, विश्व हिंदू परिषद जिल्हा मठ मंदिर प्रमुख महेश टोपले, विश्व हिंदू परिषद एकल विद्यालय अंचल प्रमुख गुलाब पावरा हे मंचावर उपस्थित होते. बैठकीला त्रिवार ओंकार राम नाम जप परिचय प्रास्ताविक विश्व हिंदू परिषद संचार प्रमुख दीलवर पावरा यांनी केले.
पहिल्या सत्रात महेश टोपले यांनी सांगितले की, ग्राम समिती गावाचा विकास, लसीकरण, ग्राम स्वच्छता, आरोग्य स्वच्छता, साप्ताहिक भजन हनुमान आरती करावे. तर दुसर्या सत्रात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे यांनी सांगितले की, आगामी कार्यक्रम वर्धापन दिन प्रत्येक ग्राम समिती गावावर व त्याच्या शेजारील दोन गावांना कार्यक्रम व्हावेत. व कार्यक्रमाची रूपरेषा समजून सांगितली. व २ नोव्हेंबर रक्तदान शिबिर, कोरोनाची तिसरी लाट दक्षता घ्यावी. त्याचे उपाय व लसीकरण प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे त्यासाठी आपण जनजागृती करावी असे सांगितले.
समारोप हिंदू परिषद आंचल प्रमुख गुलाब पावरा यांनी केला. दुर्गा वाहिनी प्रखंड प्रमुख मनिषाताई मोरे, तोरणा वळवी, रायसिंग पाडवी, सुरेश पाडवी उपस्थित होते. शेवटी जामसिंग पावरा यांनी पसायदान व जय घोष घेतले.