नवापूर l प्रतिनिधी
शहरातील जुनी पोष्ट गल्लीच्या मागील बाजूस भाजीपाला बाजाराच्या जवळ रंगावली नदी पात्रात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पुरुष जातीचा मृतदेह रंगावली नदी पात्रात मध्यभागी तरंगताना लोकांच्या लक्षात आल्याने ही बाब उघडकीस आली आहे ही माहिती वार्यासारखी गावात पसरल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली हॊती.
नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ,पोहेका गणेश बाच्छाव,युवराज परदेशी आणि त्यांची टीम घटना स्थळी दाखल झाले असून मृतदेह फुगलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटलेली नाही सदर पुरुषाच्या अंगात शर्ट नसून वाघपट्ट्या वाल्या काळ्या रंगाची पेंट घातलेली आहे.
मृतदेह दोन तीन दिवसांचा असल्याचा अंदाज आहे फुगलेल्या मृतदेहाच्या अगदी हाके च्या अंतरावर कपडे भरलेली थैली आढळून आली आहे.
यावेळी शहरातील पत्रकार जनक दलाल, यांनी नदी पात्राच्या मधोमध असलेला मृतदेह किनाऱ्या पर्यन्त आणला नंतर सामाजिक कार्यकर्ते आबा मोरे ,जाकीर शेख आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्याने मदत करत कापडी झोळी मध्ये टाकून नदीपत्रातून करंजी ओवारा पुला वर आणून मृतदेह टेम्पो च्या साह्याने उपजिल्हारुग्णालयात शवविच्छेदना साठी आणण्यात आले.
नवापूर शहरातील रंगावली नदी पात्रात सकाळी 7 वाजता मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली होती. सदर मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदना साठी आंनण्यात आला होता तेथे प्रत्यक्ष दर्शी ने बघितल्या नंतर त्याची ओळख पटली असून माजी नगराध्यक्ष दामू अण्णा बिऱ्हाडे यांच्या निवासस्थाना जवळ बेलदार वाड्यात राहत होता.
मयताचे मृत्यू चे कारण समजू शकलेले नाही
मयत युवकाचे नाव सुनील देवा नाईक आहे त्याचे आई वडील अनेक वर्षा पूर्वी मयत झाले होते. तो घरात एकटाच राहत असल्याचं माहिती मिळाली असून गावातील नातेवाईका कडून मृतदेह ताब्यात घेण्याची कारवाई सूरु आहे.
माजी नगराध्यक्ष दामू अण्णा बिऱ्हाडे यांच्या सहकार्याने व मयत सुनील नाईक च्या मित्रा कडून अंत्यसंस्कार ची तयारी करण्यात येत आहे.








