नंदूरबार l प्रतिनिधी
अनुदानित रेशन धान्य सवलत बंद करा अशी मागणीचे निवेदन काशिनाथ बधू पाटील रा. ईश्वर कॉलनी नंदुरबार व सुरेश शिवाजी चौक रा. रनाळे या संबंधिताकडे केसरी रेशन कार्ड असून त्यावर त्यांना अनुदानित धान्य सोबत मिळते मात्र त्यांनी उत्पन्न वाढ झाल्यामुळे अनुदानित राशन धान्य सवलत ऑगस्ट 2022 पासून बंद करावी तहसीलदार यांच्याकडे दिले आहे.

अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय कुटुंब योजना मधील लाभार्थ्यांना सवलतीचे दरात दरमहा अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो. मात्र अनेक वेळा लाभार्थी यांचे अथवा कुटुंबातील अन्य व्यक्तींचे उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळे ते सदर रेशनची उचल करत नाही. मात्र त्यामुळे प्रतीक्षा यादीतील अन्य शिधापत्रिकाधारक यांना शिल्लक रेशनचा लाभ मिळत नाही. परिणामी अनेक गरजू लाभार्थी योजने पासून वंचित राहतात,
त्यामुळे विहीर उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांनी अन्नधान्य योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन महेश शेलार यांनी केले होते.
ज्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्य नको असेल त्यांनी पुरवठा विभाग किंवा संबंधित रेशन दुकानदार यांच्याकडे अर्ज केल्यास त्यांचा धान्य पुरवठा खंडित करण्यात येतो, असेच एक लाभार्थी काशिनाथ पाटील व श्री.चकोर यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांची भेट घेऊन निवेदन दिल्यामुळे त्यांचा धान्य पुरवठा बंद करण्यात आला आहे.
या पद्धतीने ज्या शिधापत्रिकाधारक यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात रुपये ४४ हजार व शहरी भागात रुपये ५९ हजार यापेक्षा जास्त असेल त्यांनी स्वतःहून या योजनेतून बाहेर पडावे जेणेकरून अन्य गरजू लाभार्थी यांना या योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांना सवलतीच्या दरातील अन्नधान्य पुरवठा करणे शासनास शक्य होणार आहे. तालुक्यातील निराधार विधवा व वृद्ध, शेतमजूर, रोजंदारी मजूर, घरगुती काम करणाऱ्या घरेलू मोलकरीण, अतिशय लहान व्यवसाय करणारे कुटुंबीय, हातगाडीवर किंवा फिरते व्यावसायिक अशा शिधापत्रिकाधारक यांना उदरनिर्वाह करणे कठीण आहे त्यांना रेशनचे धान्य मिळणे गरजेचे आहे.सधन कुटुंबांनी योजनेतून बाहेर पडल्यास अशा गरजू कुटुंबांना लाभ देण्यात येईल.
तसेच चुकीचे उत्पन्न दाखवून शासनाची दिशाभूल करून लाभ घेतल्यास प्रसंगी कायदेशीर कारवाई करण्याचे देखील शासनास अधिकार आहेत.
शहरी भागात मोठ्या प्रमाणात नोकरवर्ग व व्यावसायिक असून त्यांनी स्वतःहून योजनेतून बाहेर पडा असे आवाहन पुरवठा निरीक्षण अधिकारी रमेश वळवी यांनी केले आहे.








