नंदुरबार l
नेहरु युवा केंद्रामार्फत स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना, मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृध्दींगत करणे आणि तरुण युवा कलावतांना व्यासपीठ निर्माण करुन देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे 2 ऑक्टोंबर 2022 आयोजन करण्यात आले आहे.
या युवा उत्सवात चित्रकला, कविता लेखन, कार्यशाळा आणि स्पर्धा, जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जिल्हा युवा संम्मेलन भारत 2047 युवा संवाद कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धक नंदुरबार जिल्ह्यांचा रहिवासी असावा. 1 एप्रिल 2022 रोजी वय 15 ते 28 वर्ष असावे. एका व्यक्तींस एकाच स्पर्धेत सहभागी होता येईल. विजेत्यांना रोख बक्षीस,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र,कार्यशाळा स्पर्धेसाठी प्रत्येकी 30 युवकांना सहभागी होता येईल. यासाठी प्रथम बक्षीस 1 हजार, द्वितीय 750 तर तृतीय बक्षीस 500 रुपये व प्रमाणपत्र असे राहील. जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेसाठी 10 युवकांना सहभागी होता येईल.यासाठी प्रथम 5 हजार रुपये, द्वितीय 2 हजार तर तृतीय 1 हजार रुपये बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येईल.
जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमांत 10 समूह संच सहभागी होऊ शकतील एका समृहनृत्यात किमान 5 तर कमाल 20 स्पर्धक सहभागी होता येईल. यासाठी प्रथम 5 हजार रुपये, द्वितीय 2 हजार 500 तर तृतीय 1 हजार 250 रुपये बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर जिल्हास्तरीय युवा संम्मेलनात भारत 2047 युवा संवाद मध्ये 100 युवक सहभागी होऊ शकतील यात सहभागी युवकांमधून विषयांची मांडणी, वकृत्व शैली या आधारावर चार युवकांची परिक्षकांतर्फे निवड करुन प्रत्येकी 1 हजार 500 रुपये बक्षीस देण्यात येईल.
.
या जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी युवकांनी https://forms.gle/eGZTrefZksag2Toh8 या लिंकवर 1 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी नेहरु युवा केंद्र, नंदुरबार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अर्थ कौशिक यांनी केले आहे.