नंदुरबार l
शहरातील घी बाजार परिसरात दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने ५३ हजार रुपये असलेली पिशवी चोरुन नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील वावद येथील लोटन नामदेव पाटील हे देसाईपुरा परिसरातील महाराष्ट्र ग्रामीण बॅँकेतून चेकद्वारे ४५ हजार रुपये व घी बाजार चौकाजवळील सेंट्रल बॅँक ऑफ इंडिया येथील त्यांच्या अकाऊंटमधून ८ हजार रुपये काढले. एकूण ५३ हजार रुपये हे कापडी पिशवीत ठेवून ती पिशवी दुचाकीच्या (क्र.एम.एच. ३९ टी ६६३३) लॉक नसलेल्या डिक्कीत ठेवले.
लोटन पाटील हे घी बाजारातून शिरीषकुमार चौककडे जात असतांना घी बाजार चौकात ट्रॅफिक झाल्याने त्यांनी दुचाकी थांबवून डिक्कीतील पिशवी काढण्यासाठी पाहिले असता डिक्कीत ठेवलेली पिशवी मिळून आली नाही. त्यांनी परिसरात पिशवीचा शोध घेतला असता मिळून आली नाही. याबाबत लोटन पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अतुल बिऱ्हाडे करीत आहेत.