नंदुरबार l
शहरातील अंधारे चौकात एस.टी. बस चालकासह वाहकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार बस आगारातील चालक शशीरथ पाटील व वाहक अरुण भील हे बस घेवून (क्र.एम.एच.१४ बीटी २०७३) नंदुरबार ते बलवंड जात होते. यावेळी बस अंधारे चौकात आली असता स्टॉपवर थांबलेल्या प्रवाशांना वाहन अरुण भील यांनी बसमध्ये जागा नाही म्हणून मागून येणाऱ्या बसमध्ये या असे सांगितले.
याचा राग आल्याने राकेश देवचंद मराठे व दोन अनोळखी इसमांनी बसचा दरवाजा उघडून अरुण भील यांच्याशी हुज्जत घातली. अरुण भील यांनी त्यांना बसच्या बाहेर जाण्यास सांगितले असता तिघांनी चालक शशीरथ पाटील व वाहक अरुण भील हे शासकीय कर्तव्य बजावित असतांना अडथळा निर्माण केला.
तसेच शशीरथ पाटील यांच्या चेहऱ्यावर हाताने मारहाण केली. याबाबत शशीरथ पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३५३, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते करीत आहेत.








