नंदुरबार l

येथील सावता फुले फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ नंदनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ (रविवार) रोजी माळीवाडा परिसरात लम्पी स्कीन प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ११३ गाई, वासरु व बैलांना लम्पी स्कीन प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसीज या साथरोगासारखी लक्षणे आढळून येत असल्याने रोग प्रादुर्भाव प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होऊ नये यासाठी तसेच पशुपालकांनी पशूंना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकर्यांच्या तसेच पशुपालकांच्या घरोघरी जावून सावता फुले फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे गाई, वासरु व बैलांना लम्पी स्कीन प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
यावेळी सावता फुले फाऊंडेशनचे मनोज गायकवाड, भरत गायकवाड, रोटरी नंदनगरीचे अध्यक्ष अनिल शर्मा, किरण दाभाडे तसेच माळीवाडा परिसरातील ज्येष्ठ अनुभव शेतकरी व नागरीक बी.एन.माळी, चिंतामण जंगू माळी, गणेश बावीस्कर, शांताराम विठ्ठल बागूल, अर्जुन सदाशिव माळी, आण्णा सुका माळी, विजय माळी, धाकला माळी, गोरख रामचंद्र माळी तसेच इतर शेतकरी बांधव मोठ्या उपस्थितहोते. लसीकरणासाठी पुशसंवर्धन विभागाचे डॉ.दिनेश गावीत, नरेंद्र शिंदे, नरेंद्र पाटील, सचिन धनगर, रवींद्र मोरे यांचे सहकार्य लाभले.









