नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शाखेच्यावतीने आठवणीतील डॉ . नरेंद्र दाभोळकर हा कार्यक्रम घेण्यात आला . या वेळी सर्व कार्यकत्यांनी आपल्या आठवणीतले डॉ . नरेंद्र दाभोळकर यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले .
डॉ . नरेंद्र दाभोळकर यांच्याजुन्या आठवणी , सहवास , ते कशा पद्धतीने आपल्याला भेटले , त्यांचे अनेक व्हिडिओ असतील डॉक्टर प्रत्यक्ष भेटले असतील असे अनुभव कार्यकर्त्यांनी व्यक्त केले . अंनिसचे जिल्हाध्यक्ष हैदरअली नुरानी , महाराष्ट्र अनिसचे माजी अध्यक्ष डॉ . शशांक कुलकर्णी , शहादा शाखेचे अध्यक्ष डॉ . बी . डी . पटेल व उपाध्यक्षा संगीताताई पाटील व डॉ . अलका कुलकर्णी ,मानक चौधरी , राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते कैलास भावसार , ॲड . गोविंद पटेल , प्रविणा कुलकर्णी , सुनीता पटेल , प्रवीण महिरे , धीरज शिरसाठ , पाडवी , विजय बोडरे , श्याम भलकारे , प्रदीप केदारे , अरिफ मन्यार , प्रवीण सावळे , भटू वाकडे , हृदय चव्हाण , एच . एम . पाटील आदी कार्यकर्ते व इतर संस्था व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते . राज्याचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी देखील डॉक्टरांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला . सूत्रसंचलन जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले . शहादा शाखेचे कार्याध्यक्ष संतोष महाजन यांनी प्रास्ताविक केले . सचिव श्रीकांत बाविस्कर यांनी आभार मानले .