Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते दुष्काळ अनुदानासाठी बॅकेला दिला सहा कोटीचा धनादेश

team by team
September 26, 2022
in राजकीय
0
पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते दुष्काळ अनुदानासाठी बॅकेला दिला सहा कोटीचा धनादेश

नंदुरबार | प्रतिनिधी

 

नंदुरबार तहसिल कार्यालयात पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते तालुक्यातील दोन शेतकर्‍यांची आत्महत्या प्रकरणी त्यांच्या वारसांना धनादेश वाटप करण्यात आले तसेच खरीप २०२१ दुष्काळ अनुदान वाटप करण्यासाठी ५ कोटी ९४ लाख ८५ हजाराचा धनादेश बँकेला देण्यात आला. यावेळी विविध दाखल्यांचे वाटपही करण्यात आले.

 


या कार्यक्रमास खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हा परिषद सदस्य डॉ.सुप्रिया गावीत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, पुलकींत सिंग, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, तहसिलदार भाऊसाहेब थोरात,मुख्याधिकारी अमोल बागुल आदी उपस्थित होते.

 

 

यावेळी डॉ.गावीत म्हणाले की, सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा निपटारा व्हावा, यासाठी हा ‘सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या सेवा पंधरवड्यात आपले सरकार पोर्टलवरील 392 सेवा, महावितरणांच्या 24 सेवा, डी.बी.टी. 46 सेवा, नागरी सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा तसेच विविध विभागांचे स्वत:च्या योजनाशी संबंधित पोर्टलवरील प्रलंबित अर्ज अशा विविध माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे. मदत आणि पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा,

 

 

ग्रामविकास, नगरविकास, आरोग्य, पाणीपुरवठा, महावितरण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागातील सेवांचाही त्यात समावेश करण्यात आला असल्याने या सेवा पंधरवाडाच्या काळात सर्व सामान्यांची प्रलंबीत असलेली कामे प्राधान्याने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.

 

 

यावेळी पालकमंत्री डॉ.गावीत तसेच मान्यवराच्या हस्ते शेतकरी आत्महत्या प्रकरणांअंतर्गत मंजूर प्रकरणातील दोन लाभार्थांच्या वारसांना प्रत्येकी 30 हजार रुपये, 16 खातेदारांना सातबारे, 7 लाभार्थ्यांना राजस्व अभिनामार्फत दाखले वाटप, 31 शिधापत्रिकाधारकांना नवीन शिधापत्रिकेचे वितरण, रेशनधारक दुकानदाराना शिधापत्रिकेधारकाकडून ऑनलाईन रक्कम स्विकारण्यासाठी क्यु-आर कोडचे वितरण, प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेचे प्रमाणपत्र, 7 विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, विवाह प्रमाणपत्र, तसेच खरीप 2021 दुष्काळ अनुदानाचे वाटप करण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया यांना 5 कोटी 94 लक्ष 85 हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. यावेळी खासदार डॉ.हिनाताई गावीत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता नायब तहसिलदार भिमराव बोरसे, राजेश अमृतकर, रिनेश गावीत, रमेश वळवी, प्रा.माधव कदम यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

खा. डॉ.हिना गावित यांच्या हस्ते बाराशे लाभार्थ्यांना गॅस शेगडी वाटप

Next Post

अक्कलकुवा, नवापूर, तळोदा, अक्राणी तालुक्यांमधील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदानाची तारीख बदलली

Next Post
सावधान : नंदुरबार जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित, बाजार भरवण्यास बंदी

अक्कलकुवा, नवापूर, तळोदा, अक्राणी तालुक्यांमधील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदानाची तारीख बदलली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add